माण तालुका प्रतिनीधी: – निलेश कोकणे
देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल!
ठाणे जिल्ह्यासह 28 जिल्ह्यांमध्ये उभारणार नवोदय विद्यालयांची शृंखला…
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने नवोदय विद्यालय योजना विस्तारासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये ही विद्यालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली असून यासाठी एकूण अंदाजे ₹2359.82 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार!


