पुणे विभाग : सचिन दगडे
पुणे : शिरूर शहरातील डंबेनाला येथिल छोटूभाई फकीर मोहम्मद शेख (वय ८५) हे बिडी पित असताना बिडी कपड्यांवर पडल्याने आग लागली आणि होरपळून मृत्यू झाला आहे. त्यांना पॅरालिसिसचा आजार होता.घरामध्येच बीडी पित असताना ही घटना घडली आहे.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे त्यांचा मुलगा हमीद छोटू शेख (वय 48) यांनी आकस्मित निधनाची खबर दिली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छोटूभाई हे बुधवारी दुपारी बिडी पित होते. यावेळी त्यांच्या लुंगीला आग लागली. यावेळी घरातील नातेवाईकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र ते गंभीर भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा राउत हे करत आहे. पोलिसांनी सदर प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


