सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद /भिमवाडी येथील रस्ता असा झाला की रस्त्यात खड्डे की खडड्यात रस्ता हेच येथील नागरिकांना कळेना देशमुख नगर ते भिमवाडी हा रस्ता पाच नगर (वार्ड ) ला जोडणारा रस्ता असून येथील नागरिकांनी बरेच वेळा तक्रार सुचना करून सुद्धा प्रशासन झोपेच सोंग घेत आहे विद्यार्थांना या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे
तसेच वयोवृद्ध या रस्त्याचा तर नकार देत आहे ह्या पाऊसाळ्यात तर पाय ठेवण्यासाठी जागा नाही राहीली पूर्ण चिखलमय रस्ता झाला असून लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करित आहे फक्त भक्कम मतासाठी इकडे नेते फिरतांना दिसत असते हे मात्र नक्की

