अकोला विभाग प्रतिनीधी: – गणेश वाडेकर
अकोल्यात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर अनोखे आंदोलन केले. प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक होऊन थेट कार्यालयातील खुर्चा तहसील कार्यालयाबाहेर लटकवल्या. संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना त्रास होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रहारला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे प्रहार पक्षाने लाभार्थ्यांना सोबत घेऊन आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या आंदोलनात शेकडो लाभार्थ्यांसह अपंग बांधव सहभागी झाले होते. डीबीटीची योग्य माहिती लाभार्थ्यांना योग्य दिली जावी, अशी मागणी करण्यात आली.

