अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
रामदास पेठ पोलिस स्टेशन हद्दीतील माळीपुरा येथे दोन ऑटोची तोडफोड करणाऱ्या दोन गावगुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. ८ जुलै रोजी ओम खरे व ललित बनसोडे या दोघांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून अटक केली आहे. सदर कारवाई रामदास पेठ पोलिसांनी केली आहे.
सदर घटनेमुळे माळीपुरा परिसरात दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा परिसर संवेदनशील असून अशा घटनेतून गैरसमज पसरून वातावरण दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशा परिसरातील रामदासपेठ पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.

