ज्ञानेश्वर कागणे:- कंधार प्रतिनीधी
बालवयात प्रथम शिक्षण देणारे आई वडील आणि शाळेतील शिक्षक हे आपल्या जिवनाला आकार देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात . त्यांच्या आर्शीवादा शिवाय मिळालेल्या यशाला आणि जिवनाला अर्थ नसते त्यामुळे प्रथम गुरु आई वडील आणि नंतर आपले शिक्षक यांनी दिलेली शिकवण आत्मसात करून जिवनात यशस्वी होता येते असे प्रतिपादन संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन.केंद्रे यांनी कंधार येथे केले .
गुरुपोर्णिमा निमित्य १० जुलै रोजी कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळेत शिक्षकांचा सत्कार व आयएएस श्रेया स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंताचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार डॉ दिनकर जायभाये ,डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यापक विद्यालय कंधारचे प्राचार्य नागरगोजे ,कंधार तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष अमरकुमार बसवंते , घुगे कोचिंग क्लासेस चे संचालक भास्कर घुमे ,महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे ,सौ उषा कागणे,माणिक बोरकर ,आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.
शाळेतील गुणवंत शेख आवेश , शिवमल्हार कल्याणपाड,अवधूत कामाळे,आयशा पठाण,नक्षत्रा मयसन्ना, अदित्य कागणे,अंश बसवंते,प्राची जाधव , केंद्रे गितांजली,गुणवंत घुमे , स्वरा कागणे,शाश्वती कौसल्ये ,सुमित जोशी , रुक्मिणी घुमे आदिसह शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आजचा विद्यार्थी जागरूक आहे त्यासाठी शिक्षकांनी स्मार्ट व्हावे आणि देशसेवेसाठी आदर्श पिढी घडवावी असे शेवटी मार्गदर्शन करण्यात आले .
सुत्रसंचलन राजू केंद्रे यांनी तर आभार आनंदा आगलावे यांनी मानले .

