मराठवाडा विभाग प्रमुख :- शुभम उत्तरवार
मा. नगरसेविका जळुबाई भोळे यांच्या घरासमोरील विद्युत (डी.पी.) हे गेल्या 30 वर्षापासुन तेथे आहे. सदरील डि.पी. पासुन आमच्या वार्डातील तरुण नामे आकाश शेषेराव कापुरे यास शॉक लागुन गंभीर जखमी झाला होता. पण सध्या तेथे वाढीव वस्ती झाल्यामुळे वार्डातील लोकांना घरे बांधण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सदरील डि.पी.ची नागरीकांच्या जिवीतास धोका असल्याची तो इतर ठिकाणी हलविने गरजेचे आहे.
त्यामुळे ती डि.पी.मा. साहेबांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगुन इतरत्र हालवुन दयावा. सदरील विनंती अर्ज हा बऱ्याच वेळा लेखी म.रा.वि.वि.के.मर्या.लोहा, व न.प.लोहा येथे अर्ज देवुनही अद्याप पर्यंत कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही.

या संदर्भात जिल्हाधिकारी मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले
यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते सुखदेव पाटील चिखलीकर, भाजपा युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सोनू महाबळे, युवा नेते सचिन नवघडे, विकास भोळे, दीपक ढवळे, आकाश महाबळे, विष्णु पवार, आकाश गोरखटकर व आदींजनाची उपस्थिती होती.

