विदर्भ विभाग प्रमुख :- युसूफ पठाण
वृक्षसेवा समितीच्या वतीने सिंधी मेघे स्मशानभूमीलगतं टेकडीवर काल स्व. श्री हरीशजी टावरी यांच्या जन्म स्मृतिदिना निमित्त मित्र परिवारा तर्फे 100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.ज्यामध्ये कडूनिंब, वड, पिंपळ, पारिजातक, टेकोमा, करंजी,आवळा,सागवान या विविध प्रजातींच्या झाडांचे रोपे होती.स्व हरीशजी टावरी यांचे वर्धा जिल्हातील सामाजिक क्षेत्रातील योगदान अमूल्य होते त्यांच्या सेवा भावी स्वभावामुळे त्यांच्या आठवणी कायम जपण्याचा संकल्प वृक्ष सेवा समितीचे सदस्य श्री विक्रम टावरी यांनी वृक्षारोपनाच्या माध्यमातून जपला जाईल असे यावेळी संबोधले. वृक्ष सेवा समितीचे सदस्य श्री किशोर बाहे, प्रदीप मेंढे यांनी टेकडीवरील लागवड करून असलेल्या झाडांची माहिती उपस्थिताना दिली. यावेळी 2017 पासून टेकडीवर वृक्षारोपण व सांगोपन कार्य सुरु असून पेपर रद्दी संकलनातून बोरवेल खोदकाम झाल्यामुळे पाण्याची मुबलक व्यवस्था असल्यामुळे या वर्षी मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यात सहकार्य करण्याचे आव्हान वृक्ष सेवा समितीचे सचिव रवींद्र नागपूरकर व किशोर बोकडे यांनी केले.
यावेळी विक्रम टावरी, श्रीमती हर्षा टावरी, डॉ श्याम टावरी, डॉ रवीश टावरी, डॉ हासम शेख, कुडलिक बोरकर,विनीत टावरी, खुशबू टावरी, प्रकाश चांदेकर,अविका टावरी,शक्ती गिरीपुंजे,प्रभाकर राऊत,नीरज लोहकरे, संजय शर्मा, अण्णा पेंटे, दर्शन महाकालकर, दीपक चुटे, विनोद वानखेडे, ददनसिंग ठाकूर, मुकेश युरही, शैलेंद्र भुसारी, सुनील लंगडे, सुनील बेदरकर, महेश अडसुळे, सचिन खंडारे, सचिन धरणेदर, विलास कावळे, सुरेश पेठे, नारायण चरडे, विलास भवरे, अशोक भिवगडे, श्याम भाऊ परसोडकर,मंगेश भोंगाडे, राहुल गोल्हार, प्रदीप मेंढे,योगेश चौधरी,यश आकरे,श्रीकांत कहाते, हेमंत माध्यसवार,क्रिष्णा नांदुरकर या सर्वांनी स्व हरिशभाऊ टावरी यांना वृक्षारोपण करून विनम्र अभिवादन केले.

