राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
तालुक्यातही येवती येथील तलाठी कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान २०२५ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मा. उपविभागीय अधिकारी राळेगाव व तहसीलदार राळेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ७ जुलै रोजी ग्रामसभेचे आयोजन करून गावात व परिसरातील नागरिकांमध्ये व्यापक प्रसिद्धी देण्यात आली होती. ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले व लाभार्थ्यांची यादीही अंतिम करण्यात आली.
शिबिरात महसूल विभागामार्फत एकूण ४०४ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे, फेरफार नोंदी आदींचा समावेश होता. आधार दुरुस्तीसाठी कॅम्प लावण्यात आला होता ज्याचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला.
आरोग्य विभागाच्या वतीने ६८ रुग्णांची तपासणी करून औषधांचे वाटप करण्यात आले, तर कृषी विभागाने १७ शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन दिले. ग्रामपंचायतीमार्फत ७९ रहिवाशांना आवश्यक दाखले देण्यात आले.येवती तसेच आजूबाजूच्या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ एका ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून महसूल प्रशासनाचे व शासनाचे आभार मानले त्यावेळी मंडळ अधिकारी पाडे, कोळी तलाठी येवती , निलेश देवळे तलाठी हजर होते

