प्रतिनिधी:- गितेश भोईर (कसारा)
कसारा मार्गावरील झालेल्या रेल्वे फुलाला रविवारी मोठे भगदाड पडले तसेच हा पूल कोसलता कोसलता वाचला आहे य फुलाचे काम गेल्या चार वर्षापासून प्रगतिपथावर आहे त्यामुळे येथुन एकेरी वाहतूक सुरू असून बाजूला केवळ बांधकामाचे स्ट्रक्चर उभे केले आहे.
काम कासवगतीने सुरू आहे.त्यातच मुसळधार पाऊसामुळे जीर्ण झालेल्या फुलाला भगदाड पडले. परंतु ही वाहन नव्हते अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती मिळालेल्या माहितीनुसार कल्याण कसारा मार्गावरील कसारा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे फुलाच्या उभारणीचे काम 4 वर्षापूर्वी हाती घेण्यात आले होते
मात्र रेल्वे प्रशासनाने वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध न करता जीवनमान संपलेल्या पुलावरूनच एकरी वाहतूक सुरू ठेवली हा फुल कमकुवत असूनही रेल्वे अधिकारी ठेकेदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

