राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव तालुक्यातील झाडगावचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ श्री लखाजी महाराज पुण्यतिथी च्या अनुषंगाने ह. भ. प. सोनाली दीदीजी महाजन आळंदीकर यांच्या अमृतमय वाणी तुन सात दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम सह भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन केले आहेत.
ज्यामध्ये 8 जुलै ते 15 जुलै पर्यत चालणाऱ्या कार्यक्रम मध्ये 10 तारीख कलश स्थापना 14 जुलै संत लखाजी महाराज विदयालय झाडगाव चा अभिषेक राहील नंतर श्रीच्या पादुकाची पालखी मिरवणूक वं नगर प्रदर्शना राहील, दिनांक -15 जुलै ला काल्याचे किर्तन ह. भ. प सोनाली दीदीजी महाजन यांचे आणि नंतर भव्य महाप्रसादाचे नियोजन राहील त्याच रात्री गावातील महाराष्ट्रची लोककला असलेले भारूड आणि विशेष गावातील कलाकार मुलांना स्टेज मिळावा त्यांचातील कलेचा विकास व्हावा या अनुषंगाने गावातील विजय महाराज, पवन महाराज, उमेश महाराज यांचा विनोदी भारूड कार्यक्रम होणार आहेत.

कार्यक्रमाची सांगता म्हणून दरवर्षी प्रमाणे श्री क्षेत्र नानाजी महाराज कापसी येथे कार्यक्रमाची सांगता होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रम मध्ये च दैनंदिन कार्यक्रम -सामुदायिक ध्यान, प्रार्थना हरिपाठ, गावातील महिलां- पुरुष भजनी मंडळाचे दुपारी 3 वाजता भजन वं सायंकाळी 7 वा रामकथा याप्रकारे दैनंदिन कार्यक्रम या पुण्यतिथी सोहळ्यात होणार आहेत तरी 8 ते 15 होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवातील रामकथा, तसेच पालखी मिरवणूक, महाप्रसाद चा लाभ गावातील तसेच बाहेरगावातील भक्त मंडळींनी घ्यावा असे आव्हान या कार्यक्रमाचे आयोजक समस्थ ग्रामवासी झाडगाव यांच्या मार्फत करण्यात आलेले आहेत.

