- महाक्रांती न्यूज कार्यकारी संपादक/राठोड रमेश पंडित
नांदेड:- सहकारी शिक्षण पतपेढीतील बेकायदेशीर व नियमबाह्य नौकर भरती व सहकार उपनिबंधक यांच्या नियमबाह्य नोकरभरती परवानगी विरोधात शिक्षक परिषदेसह शिक्षक सेना, शिक्षक भारती ,प्राथमिक शिक्षक संघ, काट्राईब शिक्षक संघटना, आदर्श शिक्षक समिती, माध्यमिक शिक्षक संघटना,पती-पत्नी एकत्रीकरण शिक्षक घटनेचे सहकार कार्यालया समोर मंगळवारी दुपारी दोन ते पाच या वेळेत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. .
जिल्ह्यातील सहकारातील सर्वात मोठी शिक्षकांची असलेली पतसंस्था गेल्या दोन वर्षापासून सत्ताधारी संचालक मंडळाच्या अनागोंदी कारभारामुळे चर्चेत आली आह. या पतसंस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय न ठेवताच पतसंस्थेत बेकायदेशीररित्या नौकर भरती केल्याने सभासदांमध्ये मोठा तीव्र संताप निर्माण झालेला आहे. तसेच सहकार उपनिबंधक कार्यालयाकडून नियमबाह्य परवानगी मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत ही नोकर भरती कुठलीही प्रक्रिया राबवता सरळ नियुक्तीने भरती केली.या विरोधात एक दिवशीय धरणे आंदोलन शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली
राज्यसंघटन मंत्री सुरेश दंडवते, राज्य प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, शिक्षक संघाचे नेते निळकंठ चोंडे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण,विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे, विभागीय कार्याध्यक्ष बालाजी बामणे, विभागिय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,अजित केंद्रे, विभागीय संघटक ग.नु जाधव, सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुणके, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल बी चव्हाण, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर मांजरमकर,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर हसगुळे, आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशटवाड, पत्नी एकत्रीकरण शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार उपनिबंधक कार्यालय नांदेड समोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे .तरी या आंदोलनास सभासदांनी मोठ्यासंखेने उपस्थित रहावे असे शिक्षक परिषदेचे जिल्हा व्यंकट गंदपवाड ,जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड, शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस रवि बंडेवार, शिक्षक भारतीचे जिल्हा सरचिटणीस अमोल कुलकर्णी,संघाचे जिल्हा सरचिटणीस रमेश घुमलवाड ,आदर्श शिक्षक समिती चे जिल्हा सरचिटणीस दिलीप दंतुलवार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील मोरे शिक्षक परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष धोडिबा पांडागळे, जिल्हा प्रवक्ते रवि ढगे, कारयालयीन सचिव बळवंत मंगनाळे,वरिष्ठ कार्याध्यक्ष नरसिंग एंड्रलवार, बालाजी पांपटवार ,शिक्षक सेनेचे गंगाधर कदम,मनोहर भंडेवार यांनी केले आहे.


