वडकी पोलिसांची देवदरी घाटात कारवाई
२७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून म्हशीचे बछडे घेऊन जाणारा कंटेनर ट्रक जप्त करून ५५ बछड्यांची पोलिसांनी सुटका केली असून म्हशीच्या बछड्या सह २७ लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई वडकी पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या दीड वाजताच्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवदरी घाटात केली आहे.
नागपूरवरून तेलंगणा राज्यात कत्तलिसाठी घेवून घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पेट्रोलिंग दरम्यान वडकी पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर देवगिरी घाटात सापळा रचला दरम्यान नागपूरकडून म्हशीचे बछडे घेऊन येणाऱ्या एच आर ६७ सी २००५ या क्रमांकाच्या कंटेनर ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये म्हशीचे बछडे दोरखंडाने बांधलेले दिसले पोलिसांनी कंटेनर ट्रक जप्त करून सर्व बछड्यांची गोरक्षण संस्थेत रवानगी केली
यातील आरोपी इस्तफबाल तोशीन ३१ वर्ष राहणार हुशणाबाद जिल्हा मुजफ्फरनगर साधनशफी वय २० वर्ष राहणार किटीपुरा जिल्हा बागपळ काशिम अब्दुल गप्पार वय २३ वर्ष राहणार बागपळ सद्दाम अब्दुल गप्पार ३५ वर्ष राहणार बागपळ जब्बार अफ्रार वय ४० वर्ष राहणार मुज्जफर नगर या सर्व आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी ५५ म्हशीचे बछडे प्रत्येकी किंमत ५ हजार रुपये एकूण २ लाख ७५ हजार रुपये कंटेनर किंमत २५ लाख रुपये असा एकूण २७ लाख ७५ हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनात बडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे पोलीस कर्मचारी भोजराज करपते विनोद मोतेराव निलेश वाढई, वाहन चालक अमीर कीन्नाके यांनी केली आहे

