- पियूष गोंगले माहिती संकलन विभाग प्रमुख महाराष्ट्र/
/झाडीबोलीचा वारसा पुढे नेण्याचा केला संकल्प.
(अहेरी) – तहसील
झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष मा. प्रा. विनायक धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०६.०७.२०२५ रोज रविवारला संघमित्रा बुद्धविहार आलापल्ली येथे अहेरी तालुक्यात झाडीबोली साहित्य मंडळाच्या तालुका कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली.
या कार्यकारिणीमध्ये लक्ष्मण अंकलू रत्नम यांची तालुकाध्यक्ष, तर संतोष चिकाटे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सौ. सुमन अशोक चव्हाण आणि दिवाकर मादेशी, कोषाध्यक्षपदी कु. सीता टेकुलवार, सहसचिव म्हणून सौ. रचना बोमकंटीवार, तर संघटक म्हणून कु. ललिता दहागावकर, अमोल दुर्योधन व कु. संगीता दुधे यांची निवड करण्यात आली आहे.
यावेळी झाडीबोली साहित्य मंडळाचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष लक्ष्मण अंकलू रत्नम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “झाडीबोली ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपल्या जीवनशैलीची, आपुलकीची आणि ओळखीची शिदोरी आहे. तिचे जतन होणे अत्यावश्यक आहे.” तर सचिव संतोष चिकाटे म्हणाले, “आपल्या झाडीबोलीत जीवनाचा गंध आहे. तो मनामनात रुजावा, यासाठी कार्यकारिणी कटिबद्ध राहील.”
कार्यक्रमाला गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीतील सौ. वर्षा पडघन, संजीव बोरकर, उपेंद्र रोहनकर, मारोती आरेवार, सौ. वर्षा राजगडे आणि कु. रोशनी दाते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीव बोरकर यांनी, तर आभार प्रदर्शन मारोती आरेवार यांनी केले.


