अकोला जिल्हा प्रतिनीधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी अनिल मालगे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसने यांनी समीर भाऊ भुजबळ अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन केली यावेळी ओबीसी नेते ईश्वर बाळबुद्धे समता परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बापू भुजबळ, रवी सोनवणे, विभाग संघटक गजानन इंगळे अरविंद गाभणे प्रकाश बिडकर शत्रुघ्न बिडकर आदी मान्यवर उपस्थित होते
यवतमाळ येथे संपूर्ण झालेल्या या बैठकीत ही कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसने यांनी जिल्ह्याची कार्यकारणी समीर भाऊ भुजबळ यांना सादर केली यावेळी अनिल मालगे यांची समता परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी महानगर अध्यक्ष श्रीराम पालकर जिल्हा सचिव गजेंद्र काळे बळीराम झांबरे, विनोद मिरगे वामनराव तायडे, चक्रधर राऊत, यांच्यासह जिल्ह्याचे कार्यकारणी व तालुका कार्यकारणी मोठ्या संख्येने उपस्थित होती









