गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
एटापल्ली एका छोट्या हाती गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिने तिन्ही दुचाकी वाहनांना आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या Duster चारचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, एका जखमीस चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये अज्जू कुर्सामी (वय २८) व रुणिता कुर्सामी (वय २५) — दोघेही अलदंडी, एटापल्ली येथील रहिवासी असून, तसेच शंकर उसेंडी (वय २५), एटापल्ली येथील असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, अज्जू कुर्सामी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

दरम्यान, ज्या Duster कारला धडक बसली, ती कार सचिन खंडेकर यांची असून, ती अपघातावेळी रस्त्याच्या कडेला उभी होती.
या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.


