कंधार प्रतिनीधी: – ज्ञानेश्वर कागणे.
कंधार शहर हे विकासापासून वंचित राहिले असून हे शहर ऐतिहासिक व पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराला राज्यमार्गाला जोडण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून यासंदर्भात काही दिवसापूर्वी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून शहरालगतचे चार मुख्य रस्ते राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी गडकरी यांना साकडे घातले आहे. हा प्रश्न शंभर टक्के मार्गी लागेल असा मला दृढ विश्वास आहे. हे रस्ते जोडल्यानंतर शहराचा चेहरा मोहरा बदलणारच .कंधार शहरातील दर्गापुरा येथील आयुब मंजिल ते मोठी दर्गा पर्यंतचा सीसी रोड व बंद नाली बांधकाम व शिवाजीनगर येथील २८.७७ लक्ष रुपयाचे श्याम केंद्रे यांचे घर ते बालाजी केंद्रे यांच्या घरापर्यंत सीसी रोड व नाली बांधकाम या विकास कामाचा शुभारंभ ६ जुलै रोजी दुपारी दोन वाजता आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला.

या कार्यक्रमास स्वप्निल पाटील लुंगारे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष दत्ता पाटील शिंदे, प्राचार्य किशनराव डफडे, माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद जफारोद्दीन, ऋषी पाटील मोरे आंचोलीकर, बाळासाहेब पवार, मधुकर पाटील डांगे, राजकुमार केकाटे, माजी नगरसेवक बालाजी पवार, व्यंकट मामडे, शेख मन्नू, मझर शेठ, शेख आसेफ, समीर चाऊस, ९ शेठ, उत्तमराव पाटील जाधव, शिवाजी पाटाल लुंगारे, बालाप्रसाद मानसपुरे, चेतन केंद्रे, मधुकर पाटील डांगे,माणीक पाटील बोरकर, दत्ता सांगळे,राजकुमार केकाटे, माजी नगरसेवक बालाजी पवार, व्यंकट मामडे, शेख मन्नू, मझर शेठ, शेख आसेफ, समीर चाऊस, मुजीब शेठ, शिवाजी पाटील लुंगारे, बालाप्रसाद मानसपुरे, प्रकाश गोरे, दीपक गोरे, प्रभाकर केंद्रे, बाळासाहेब गरजे ,शेषराव पाटील वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

