बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी: – कविता धुर्वे
राळेगाव:- तालुक्यातील वाढोणा (बाजार) ते सावरखेड हा रोड गेला आहे, मात्र, तिथे दिशादर्शक फलक नसल्याने तसेच दुतर्फा असलेल्या झाडा-झुडपाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही.परंतु आटमुर्डी या गावातुन जाताना जिल्हा परिषद शाळेजवळ आजू बाजूला केर कचर्याचे ढीगारे असल्यामुळे गाडी चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच शाळा जवळ असल्याने वळण हे धोक्याचे ठरु शकते कारण सावरखेड करंजी साठी जवळील मार्ग असल्यामुळे वाहतूक वर्दळीचा मार्ग आहे,रस्त्यांवर योग्य दिशादर्शक फलक नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
वळण रस्त्यांवरून प्रवास करणे प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहे. अनेक ठिकाणी प्रवाशांना अपघातांना सामोरे जावे लागते.अनेक ठिकाणी वळण रस्त्यांवर अपघात होऊन जीवितहानी झाली आहे.त्यामुळे, या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. वळण रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात न आल्याने हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. संभाव्य अपघातांना आळा घालण्यासाठी येथे दिशादर्शक फलक लावण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
या रस्त्यावरून पुढे सावरखेड,करंजी,सराठी,बोराठी मोहदा येथे जाता येते,दुसऱ्या बाजूनी गाडी आली तर एकाला थांबून जावे लागते अशामुळे मोठा अपघात घडू शकते पण प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन आहे, जोपर्यंत मोठा अपघात घडत नाही तोपर्यंत प्रशासनाला जाग येत नाही.यावर उपाय म्हणून दिशादर्शक फलक लावणे, वेगमर्यादा निश्चित करणे आणि वाहतूक नियमांचे योग्य पालन करणे आवश्यक आहे.
अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.


