रायगड जिल्हा प्रतिनिधी :-कैलासराजे घरत
पत्रकार कैलासराजे घरत यांनी आषाढी एकादशी निम्मित
पेण तालुक्यातील प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी भाल येथे जाऊन सहकुटुंब पत्नी सौ.मयुरी कैलास घरत, मुलगी कु.ओवी कैलास घरत यांनी श्री विठ्ठल रखुमाईचे
चरणी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले.

श्री विठ्ठल रखुमाईचे गोड गोजिरे स्वरूप डोळ्यात साठवून ठेवले.
अतिशय मनमोहन आणि विलोभनीय असे श्री विठ्ठल रखुमाईचे
रूप पाहून मन प्रसन्न झाले. खारेपाट विभाग, पेण तालुका आणि रायगड जिल्ह्यातील अनेक हभप वारकरी संप्रदायातील भक्तगण या
आषाढी एकादशीच्या सोहळ्याला हजेरी लावून श्री विठ्ठल रखुमाईचे
गोड गोजिरे रूप डोळ्यात साठवितात. क्षेत्र विठ्ठलवाडी भाल येथील
मंदिर खूप मोठे आणि प्रशस्त आहे.
मुख्य गाभारा, मंदिराचा दर्शनीय भाग, बाहेर सभामंडपात जवळपास 1000 ते 1500
पेक्षा जास्त भक्तगण बसू शकतात. या निमित्ताने भजन,कीर्तन आणि नंतर आरती होऊन सर्व भक्तांना उपवासाचे फराळ देण्यात आला. अतिशय शिस्तीत शांत बसून सर्वजण कीर्तन ऐकत होते.
सर्व वातावरण आणि परिसर विठ्ठल भक्तिमय झाले होते.

राम कृष्ण हरी!! जय हरी विठ्ठल !!


