अकोला जिल्हा प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
अकोला – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेमध्ये जिल्हा कार्यकारणी मध्ये सर्व समाजाला सामावून घेऊन समता परिषदेची बांधणी करा असे उद्गगार अखिल भारतीय समता परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांनी यवतमाळ येथे आयोजित आढावा बैठकीत काढले अकोला जिल्हा समता परिषदेची आढावा बैठक रविवार दिनांक 6 जुलै रोजी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली होती यावेळी समीर भुजबळ यांनी अकोला जिल्ह्याचा आढावा घेतला यामध्ये त्यांनी नवनियुक्त कार्य कर्णी तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष सोबतच जिल्हा कार्यकारिणीचा परिचय करून घेत परिचय करून घेतला यावेळी सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे मत संघटनेबाबत त्यांनी जाणून घेतले यावेळी समीर भुजबळ यांनी जिल्हा कार्यकारणी ही सर्व समाज समावेशक असावी तसेच जिल्ह्यामध्ये ओबीसीसाठी लढा उभारत राहावा असे आवाहन केले
यावेळी मंचकावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बापू भुजबळ ओबीसी नेते ईश्वर बाळबुद्धे समता परिषदेचे नेते रवी सोनवणे
समता परिषदेचे प्रवक्ते नागेश जी समता परिषदेचे नेते महाडोळे यांच्यासह प्रकाश बिडकर शत्रुघ्न बिडकर उपस्थित होते यावेळी सुरुवातीला गजानन म्हैसणे यांनी जिल्ह्याचा आढावा सादर केला व जिल्हा कार्यकारणी सादर केली समीर भुजबळ यांनी प्रा तुकाराम भाऊ बिडकर यांचे बंधू प्रकाश बिडकर व शत्रूना बिडकर यांचीआस्थेने विचारपूस केली व साहेब हे स्व. तुकाराम बिडकर यांच्या प्रकृती विषयी सतत संपर्कात होते
यावेळी विभागीय संघटक गजानन इंगळे, अरविंद गाभणे, जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसने, महानगर अध्यक्ष श्रीराम पालकर, गजेंद्र काळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद मिरगे संतोष बिरबिले, वामनराव तायडे, रामदास खंडारे, बळीराम झामरे,चक्रधर राऊत, निलेश हाडोळे मुकेश इंगळे आशिष नीलकंठ घनश्याम दाते सुभाष भठ किशोर आंधळे किशोर सोनवणे किशोर रौंदळे पातुर श्रीकृष्ण भोळे सरोवर बेग, नंदू राऊत वैभव म्हैसने, शेख इस्माईल सुखदेव ढोबळे यांच्यासह तालुका व शहर तसेच जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिली


