उर्वरित शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करणार का?
प्रतिनिधी: नागनाथ लांजे
लातूर / अहमदपूर तालुक्यातील मौजे हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार व त्यांची पत्नी हे शेतात स्वतः नांगर ओढत असल्याचे चित्र समाज माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.संजय भाऊ शेटे आणि माजी राज्यमंत्री मा.श्री.विनायकराव जाधव पाटील यांनी आज अंबादास पवार कुटुंबियाची सदिच्छा भेट घेऊन या कुटुंबीयांवर असलेले व्याजासह ४५ हजार रुपय कर्जाची रोख रक्कम
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली..
याप्रसंगी प्रदेश कार्याल, मुंबई कडून ही मदत घेऊन आलेले प्रदेशचे सरचिटणीस श्री.अविनाशजी देशमुख प्रदेश पदाधिकारी प्रमोद घोगरे, शिवानंद भोसले यांच्यासह अहमदपूर, चाकूर परिसरातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह गावकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
जे कांहीं प्रकार हाडोळती येथे घडला तो जनतेच्या समोर सोशल मीडियाच्या कॅमरेत कैद करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या पत्रकार तोरणे यांचा सत्कार माजी मंत्री विनायकराव पाटील व जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते करण्यात आला.


