राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव येथे दिनांक ६-७-२५ रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजताचे दरम्यान शासकीय धान्य गोडाऊनला भिषण आग लागली .या भिषण आगीत धान्य जळुन खाक, झाले सदर आग लागल्याची माहिती सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी राळेगाव,अमित भोईटे, तहसीलदार रा केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, ठाणेदार शितल मालटे यांना मिळताच तातडीने सदर घटनास्थळी पोहचले
तातडीने राळेगाव, कळंब , यवतमाळ येथील अग्निशमन दलाला पाचारण केले . अग्निशमन दला तातडीने पोहोचुन तसेच स्थानिक समाजसेवक यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व भिषण आगीवर नियंत्रण मिळविले असून शासकीय धान्य गोडाऊनला लागलेले भिषण आगीचे गुलदस्त्यात आहे.सदर घटनेचा पंचनामा पोलिस महसुल प्रशासन करीत आहे.


