हातकणंगले प्रतिनिधी – सचिन लोंढे
हातकणंगले तालुक्यातील सावर्डे गावात आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला खिचडी वाटप उपक्रम यंदाही भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. ग्रामस्थांच्या सहभागातून आणि कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम यशस्वी झाला.
या वेळी गावच्या उपसरपंच श्रीमती द्रौपदी कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेमुळेच हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात शिवाजी पाटील, युवराज वडार, पोलीस पाटील, संदीप कांबळे, शहाजी कांबळे, अमोल सकटे, अमोल उर्फ बंडा पाटील (कुंभोज), सतीश खोत (नरंदे), नागेश कांबळे, दीप रत्न कांबळे (भेंडवडे), यशवंत चव्हाण (भेंडवडे)
विकास कुंभार (नरंदे) यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमातून सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि सेवा भावनेचा संगम घडून आला. पुढील वर्षी अधिक व्यापक स्तरावर हा उपक्रम राबवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.


