लातूर जिल्हा प्रतिनीधी: – मोहसीन खान
लातूर येथे तुळशीराम प्राथमिक विद्यालय आषाढी एकादशी निम्मित माउलीचा पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा उस्तुरगे मॅडम, सहशिक्षक G.R. माने सर, D.V.साळुंके सर,P.Y.गुरमे सर, P.N. बावचे सर, शिंदे मॅडम, भिसे मॅडम, पवार मॅडम या सर्व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांकडून टाळ, लेझीम, अभंग, फुगडी यासारखे विविध उपक्रम पालखी सोहळ्यात सादर केले.
या सर्व उपक्रमात शिवसम्राट विद्यार्थी वाहतूक सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत गोत्राळ पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. रामकृष्ण साळुंके सर, श्री.अंतेश्वर जाधव, आणि रेणापूर उपाध्यक्ष श्री. अशोक कापसे यांनीही मोलाचे योगदान दिले.


