गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
धानोरा बांधकाम कार्यालय कर्मचारीविन्या, शिपाई चालवितो कार्यालय –
आजाद समाज पार्टी
धानोरा येथील उपविभागीय बांधकाम कार्यालयात आजाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व अन्य पदाधिकारी शुक्रवारला साधारण 3 ते 4 वाजता दरम्यान एक तक्रार घेऊन गेले असता, कार्यालयात एक ही कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हते. संपुर्ण कार्यालय शिपायाच्या भरोशावर सोडून कर्मचारी भर दुपारीच घरी जात असल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केलेला आहे. याबाबत ची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करून कठोर कारवाई ची मागणी करणार असल्याचे राज बन्सोड यांनी सांगितले.
धानोरा हा थोडा दुर्गम भाग असल्याने वरिष्ट अधिकारी इकडे फारसे भटकत नाही, या गोष्टीचा फायदा घेत त्या परिसरातील बरेच कार्यालयातील कर्मचारी भर दुपारीच घरचा रस्ता पकडतात. ही पाहिली वेळ नसून असे अनेकदा आढळले असल्याचे राज बन्सोड यांनी सांगितले. उपविभागीय बांधकाम विभागात अभियंता शुक्रवार ला कार्यालयात आलेच नसल्याचे शिपा्याकडून कळाले. इतर कर्मचारी कूट गेले अस विचारले असता मला काहीच माहिती नाही. आताच एक कर्मचारी गेले असे त्यांनी सांगितले असता संबंधित कर्मचाऱ्याला फोन लावल्यावर कर्मचारी दौऱ्यावर आहेत असे बोलले. परंतु हलचल पंजी मागविली असता शिपायाने टाळाटाळ केली.
याचा अर्थ कर्मचारी मनमानी करून प्रशासकीय कामकाजाच्या वेळी शिपायाच्या भरोशावर कार्यालय सोडून नेहमी जातात. अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आजाद समाज पार्टी चे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले.


