अकोला विभाग प्रतिनिधि:- गणेश वाडेकर
अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
मूर्तिजापूर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला इसम नामे अजय उर्फ काल्या रमेश गावंडे रा-अन्ना भाउ साठे नगर मूर्तिजापूर याचेवर जबरी चोरी, जबरी चोरी करताना दुखापत करणे, चोरी, अवैधरित्या दारू विकी करणे, बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे, हद्दार आदेशाचे उल्लंघन करणे अशा प्रकाराचे गुन्हे दाखल होते त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासून त्यांचा कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी मूर्तिजापूर यांचे कडे सादर केला होता
त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून अजय उर्फ काल्या रमेश गावंडे रा-अन्ना भाउ साठे नगर मूर्तिजापूर यास अकोला, वाशिम, अमरावती जिल्यातून एक वर्षाकरीता हद्दार केले.


