अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
मूर्तिजापूर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला इसम नामे ऋषिकेश बाळु कीर्दक वय २४ वर्ष रा. सत्संग भवन स्टे. विभाग, मुर्तिजापुर जि. अकोला याचेवर संगनमत करून घातक हत्याराने किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत करणे, इच्छापुर्वक दुखापत करणे, शांतताभंग करण्याचे उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा, विवक्षीत प्रकरणी निर्वादिष्ट मनाई केलेले शस्त्र जवळ बाळगतो, संपादण, कब्जात ठेवतो, लोकसेवकाने रितसर जारी केलेल्या आदेशाचे भंग करणे, गैरनिरोध करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लिल शिवीगाळ करणे, हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे अशा प्रकाराचे गुन्हे दाखल होते.
त्याचा गुन्हेगारी अभिलेख तपासून त्याचा कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये प्रस्ताव मा. उपविभागीय दंडाधिकारी मूर्तिजापूर यांचे कडे सादर केला होता त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून ऋषिकेश बाळु कीर्दक वय २४ वर्ष रा. सत्संग भवन स्टे. विभाग, मुर्तिजापुर यास अकोला, वाशिम, अमरावती जिल्यातून एक वर्षाकरीता हद्दपार केले.

