प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी नं 1 येथे आषाढी एकादशी निमित्त “पंढरीची वारी सोहळा” मोठ्या उत्साहात संपन्न झाला, श्री रमेश शिरोसे सर यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचे ये नियोजन करण्यात आले.

इयत्ता 1 ली पासून 7वी पर्यंतचे सर्व विदयार्थी, वारकरी, संत मंडळी, विठोबा रखुमाई च्या वेशात नटूनथटून आले होते. सकाळी सर्व प्रथम टाळमृदूंग व विदुरायाच्या भजनात रममान होवून गावात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षक श्री पाटील सर,श्री गायकवाड सर सौ. भोईर मॅडम, सौ. भंडारी मॅडम,सौ घाणेकर मॅडम ग्यानबा तुकाराम, जय हरी विठ्ठल असा घोष करत वारीत सहभागी झाले या वारी सोहळ्याच्या योगे सावळ्या विठूरायाचे रूप याची डोळा याची देही अनुभवले तदनंतर विद्यार्थी शिक्षक यांनी भजन गायन केले विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
मोठ्या उत्साहत शाळेतील विद्यार्थ्यांनी वरि सोहळा अनुभवला. करण्यात आला


