कोल्हापूर विभाग प्रतिनिधी :-किशोर जासूद
अंबप : राजेंद्र हायस्कूल अंबप येथे आषाढी वारीनिमित्त भक्तिभावपूर्ण दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या सहकार्याने दिंडीची सुरुवात झाली. दादा महाराज यांच्या गोड वाणीतील अभंग गायनाला विद्यार्थ्यांनी टाळ, चिपळ्या, झांज व भजनांनी साथ दिली.
मुख्याध्यापक बी. डी. केकरे सर यांच्या हस्ते आरती करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले. मिरवणुकीचे नियोजन श्री किरण शेटे व सनगर सर यांनी केले. पालखी व रांगोळी सजावटीचे काम भारती पाटील, पूनम पाटील व अनिता पाटील यांनी तर ट्रॅक्टर व मूर्ती सजावटीचे नियोजन करवडे सर, योगेश कुंभार व दिलीप पाटील यांनी केले.
पालखी मिरवणूक शाळेच्या प्रांगणातून विठ्ठल मंदिरापर्यंत नेण्यात आली. यामध्ये शिक्षक, गुरुदेव कार्यकर्ते तसेच मुकेश पाटील, दिंडे सर, सुनील कांबळे, प्रकाश चौगुले व राजू दाभाडे सहभागी झाले होते. गावातील भाविकांनी पालखीचे स्वागत करत वारीचा आनंद घेतला. वयोवृद्धांनी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
या सोहळ्यात माजी विद्यार्थी किशोर जासूद (पत्रकार), शुभम खाडे, सुरज दाभाडे, प्रज्वल भाट, किरण दाभाडे, सौरभ गायकवाड, कृष्णात गायकवाड, पियुष माळी व महेश माळी यांचे विशेष सहकार्य लाभले.


