प्रहार संघटनेची निवेदनाद्वारे मागणी अन्यथा आंदोलन.
सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद माहूर रोडवरील काटखेडा देवी तांडा येथे
गतिरोधक बसवण्या बसनात यावा याकरिता
प्रहार संघटनेतर्फे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन देण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की
पुसद ते माहुर या मार्गावर काटखेडा फाटा व देवीतांडा येथे गतीरोधक नसल्यामुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तसेच या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी शाळा असुन या शाळेतील विद्यार्थी, गावकरी तसेच चिमुकले हे ये-जा करीत असतात. या महामार्गावरुन भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत असल्यामुळे सदर शाळेतील विद्यार्थी, तसेच गावकरी मंडळी व लहान मुले त्रस्त आहेत. याकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद येथील कार्यालयात यापूर्वी 07 मे 2025 रोजी गावकऱ्यां मार्फत देण्यात आले होते.
परंतु अद्याप ही कोणतीही कार्यवाही अथवा अंमल बजावणी झालेली नाही.
सदर महामार्गावर गतिरोधक असणे गरजेचे आहे. जेणे करुन गावकऱ्यांचा जीव सुरक्षीत राहील. या करीता आपणांस वेळोवेळी निवेदनाद्वारे
कळविण्यात आले आहे.
सदर ठिकाणी ठिकाणी १० दिवसाच्या आत गतिरोधक न बसविल्यास प्रहार संघटनेकडून,प्रहार स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. अशी मागणी प्रहार संघटने द्वारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता माथूरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे पुसद तालुका प्रमुख प्रदीप आडे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

सदर निवेदनावर
पुसद तालुका प्रमुख प्रदीप आडे,
गजानन राठोड, विनोद राठोड,सुरेश राठोड, प्रवीण इंगळे, शेख इरफान, शेख अर्शद, संतोष राठोड, मो. सलमान खान, सय्यद नूर, जीवन राठोड, लव्ह जाधव, शेख इमरान, इत्यादींच्या निवेदनावर सगळ्या आहेत.

