गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी :- आशिष लाकडे
कमलापूर : एम्प्लॉईज फॉर पीपल्स अँड स्टुडन्ट हॅरी कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने सामान्य ज्ञान व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा छल्लेवाडा येथे करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यमाजी मुंजमकर होते. प्रमुख उपस्थिती प्रा. किशोर बुरबुरे, सहाय्यक शिक्षक पेंदाम यांची होती.
सामान्य ज्ञान व चित्रकला स्पर्धेत पात्र ठरलेले विद्यार्थी स्वजल विठ्ठल दुर्गे, शर्वरी भगवान झाडे, आर्यन सुनील मुंजमकर, समीक्षा महेश कोटा, ऋषी राम चापले, संजना रामदास जुमडे, शिवानी शंकर दहागावकर व इतर विद्यार्थ्यांना या वेळेस बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकातून मुख्याध्यापक यमाजी मुंजनकर यांनी स्पर्धेच्या आयोजन आमची भूमिका स्पष्ट केली.
शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी बालवयापासूनच सामान्य ज्ञानाकडे लक्ष द्यावे. आपला परिसर व आपला जिल्हा याविषयीची माहिती असू द्यावी असे किशोर बुरबुरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक पेंदाम यांनी केले.
बक्षीसे सुशीला भगत आलापल्ली व संदीप ओंढरे अहेरी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली होती.


