महाक्रांती न्यूज नेटवर्क
थिटे सांगवी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर
सागर शेळके (तालुका संघटक – माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ)
थिटे सांगवी, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर येथे जलजीवन मिशन अंतर्गत झालेली नळ पाणीपुरवठा योजना ही चुकीच्या पद्धतीने झालेली असून ती रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन टाकण्यात आलेले आहेत, त्यामुळे झालेल्या योजनेचा पैसा हा वाया जाणारा असून पुढे ऊस वाहतूक करताना त्याचप्रमाणे रस्ता दुरुस्त करताना पाईपलाईन दबून खराब होणार असून गावास पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा निधी वाया जाणार असून सदर योजनेची सखोल चोकशी करून दोषी असणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी तसेच सदर ठेकेदाराचे बिल अदा करू नये
सदर पाईपलाईन उकरून पुन्हा रस्त्याच्या कडेने घेण्याचे सांगावे सदर योजना दुरुस्त न केल्यास व ठेकेदाराची बिल अदा केलेस मी मा.उप अभियंता, पंचायत समिती, श्रीगोंदा यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची माहिती तालुका संघटक माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ श्री सागर शेळके यांनी सांगितले असून मागण्यांचे निवेदन उप अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती श्रीगोंदा यांना दिलेले आहे.



