सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महागांव/काळी दौ दि 4 जुलै
काळी दौ पुसद रोड हिवरी येथे शिपनदी पुलाजवळील रस्त्याच्या कडेखाली अतिवृष्टीने माती खचून खड्डा पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता त्या खड्डयाची दुरुस्ती करण्याची मागणी बांधकाम मंत्री, महाराष्ट्र व सहाय्यक अभियंता, महागांव यांना निवेदन वजा तक्रारीतून संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार,महागांव यांनी केली होती, त्याचे वृतहीं वृतपत्रा मध्ये प्रकाशित झाले होते त्याची दखल घेऊन बांधकाम विभागाने अपघातास आमंत्रण देणाऱ्या रस्त्यालगतच्या या खड्ड्याची दुरुस्ती करन्याचे काम सुरु केले असून त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे पत्र संध्या संदेश रणवीर यांना प्राप्त झाले आहे.

या रस्त्यावरून दिवसभर पुसद काळी दौ वरून वाहने धावतात त्यामुळे यावर वजन पडल्याने हा पुलाखालील मातीचा भाग अजून खचून गंभीर अपघात होण्याची शक्यता बळावली होती.या बाबीची गंभीर दखल बांधकाम विभागाने घेतली व कामाला सुरुवात झाली आहे जनहितार्थ केलेल्या मागणीला यश आल्याने संध्या रणवीर यांनी याबाबत बांधकाम विभागाचे व वृतपत्र प्रतिनिधीचे आभार मानले या मागणीची प्रसिद्धी वृतपत्राने दिल्याने सदरचे काम प्रगती पथावर असल्याचे त्यांनी याबाबत मत व्यक्त केले

