अकोला जिल्हा प्रतिनिधी: – इम्रान खान सरफराज खान
अकोला – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ हे अकोला जिल्हा समता परिषदेचा आढावा घेणार असून या सोबतच समता सैनिकांना ते मार्गदर्शन करणार आहेत हा आढावा शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे रविवारी 6 जुलै रोजी दुपारी 3:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे,ह्या बैठकीला अकोला जिल्हा समता परिषदेच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी व समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अकोला जिल्हा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसणे यांनी केले आहे
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बापू भुजबळ ,रवी भाऊ सोनवणे,
विभागीय समन्वयक गजानन इंगळे अरविंद गाभणे शत्रुघ्न बिडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या बैठकीला सर्व समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गजानन म्हैसने यांनी केले आहे अशी माहिती जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे यांनी दिली.

