विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
आज दि.३/७/२०२५गुरुवारी नगर परीषद पुलगांव मुख्याधिकारी यांना मी पुलगांवकर जनते कडुन तसेच काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मनिषकुमार साहु कडून २०२१ पासून नगर परीषद मधे होत असलेले सर्व बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत आहे.
दोन वेळा बांधकाम करताना श्मसान भुमीचे बांधकाम वाहून गेले अश्या प्रकारे “सबका साथ सबका विकास,, करुन न.प.पुलगांव मधे भ्रष्टाचार शुरु असुन बांधकामात रेतीचा वापर न करता डस्ट मधे काम शुरु आहे. त्यामुळे अनेक रोड़ नाल्या उखड़लेले आहे. तसेच बिल्डींगच्या कामा मधेही अश्याच प्रकारे काम शुरू असुन कामात अनियमितता भ्रष्टाचार दिसून येत आहे. व ज्या कंपनीचा ठेकेदाराच्या नावावर कामे देण्यात येते ते आपले कमीशन घेऊन घरी बसतात काही नेमके ठेकेदार सत्ताधारी पदाधिकारी कार्यकर्तेला संगमत करुन कामे देण्यात येत आहे. या सर्व अनियमितता, निकृष्ठ दर्जाच्या बांधकाम व भ्रष्टाचारा मुळे जीव हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या आगोदर सुध्दा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट आठवड़ी बाजार येथे न.प.चे निकृष्ठ दर्जाचे बांधकामा मुळे स्लाँप पडून काही लोक मृत्यू मुखी पड़ले काही जखमी झाले होते. त्यामुळे पुलगांव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याची आपण दक्षता घ्यावी अन्यथा आम्हाला तिव्र जन आंदोलन करावे लागेल. याची नोंद घ्यावी. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष मनिषकुमार साहु,सुनील ब्राह्मणकर, गजुभाऊ पचारे, मुन्नाभैय्या शुक्ला,अशोक काळे सर,निरजभाऊ ढगे, अमरभाऊ तिनघसे,राजेंद्र रवाड़े सर,अविनाश सांगोले, सुदेश अंबादे,दिपक छालिवाल,शांती खैरकार,रितेश ठाकरे,देवानंद येसनकर, इत्यादी. आणि मी पुलगांवकर जनता उपस्थित होते.


