अकोला विभाग प्रतिनिधि :- गणेश वाडेकर
अकोला शहरातील खदान पोलिस स्टेशन हद्दीतील लग्न करायचे असल्यामुळे तुझी आणि आईची भेट घालून देतो, असे सांगत पीडित तरुणीला घरी बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी तरुणीने खदान पोलिस स्टेशनला तक्रार दिली. याच तक्रारीच्या अनुषंगाने खदान पोलिसांनी ३४ वर्षीय प्रियकराविरोधात आज गुन्हा दाखल केला आहे.
प्रकरणातील तरुण आणि तरुणी एकमेकांचे नातेवाइक असून, ते अनेक वर्षांपासून प्रेमात आहेत. शहरात खासगी नोकरी करणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.


