लातूर जिल्हा प्रतिनिधी: – मोहसीन खान
व्यंकटेश केंचे यांची भारतीय हॉकी संघात निवड अभिमानास्पद.
आपल्या लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील घरणी येथील श्री व्यंकटेशजी केंचे यांची नेदरलँड येथे होणाऱ्या वरिष्ठ गटातील युरोप दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
पुणे येथील क्रीडा प्रबोधिनीत प्रशिक्षण घेणारे व्यंकटेशजी यांनी हॉकी खेळात अनेक वेळा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. अकरा वर्षांपासून ते क्रीडा प्रबोधिनीत हॉकी खेळाचे प्रशिक्षण घेत आहेत. भारतीय हॉकी संघात त्यांची निवड झाल्याने हॉकी खेळातही लातूर पॅटर्न पुढे येत आहे.
श्री वेंकटेशजी केंचे यांच्या भावी कारकिर्दीस शुभेच्छा आणि त्यांचे कोच माजी ऑलिम्पियन अजितजी लाकर, सागरजी कारंडे यांचे देखील अभिनंदन.
माझे मित्र निलेशजी गुडले यांचे मेव्हणे व्यंकटेशजी केंचे यांच्या हॉकी संघातील निवडीने अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल ही खात्री आहे.

