राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
राळेगाव:- दिनांक ०२/०७/२०२५ रोजी सीएलबीसी ऑफिस राळेगाव येथे हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाचे आयोजन एचडीएफसी बँक राळेगाव यांच्या तर्फे करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, प्रमुख अतिथी यांचे मान्यवरांनी स्थान ग्रहण केले आणि नंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,दिप प्रज्वलन करून नंतर प्रास्ताविक मनोगत व्यक्त केले तसेच मान्यवरांनी होतकरू महिलाशी संवाद साधण्यात आला, त्या महिलाचा सत्कार आणि पुरस्कार वितरण सोहळा पार पडला .
मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,केंद्र शासनाने दिन दयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती अभियान ची स्थापना केली,त्या अंतर्गत गाव पातळीवर काम करनाऱ्या महिला आयसीआरपी समुहच्या मिटिंग घेणे,शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणे बँक लिंकेज ,उपजीविका वाढवणे,हे काम त्यांचे मेहनत जिद्द चिकाटीने काम करणाऱ्या आयसीआरपीचा सत्कार करण्यात आला .
उत्कृष्ट काम करणाऱ्या आय सी आर पी यांना सन्मान चिन्ह आणि साडी भेट म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष एम एस आर एल एम चे तालुका व्यवस्थापक मिलिंद चोपडे,प्रमुख वक्ते असलेले रिझर्व बिझनेस हेड नागपूर एचडीएफसी आशिष सहारे, उमेदअंतर्गत असलेले सीसी माननीय कोवे यांनी मार्गदर्शन केले,बी एम एम यू राजेंद्र खुरपुडे यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले प्रास्तविक भाषण संदीप एडोळे यांनी केले आशिष शहारे यांनी महिलांची संवाद साधण्यात आला चर्चा सत्रातून अतिशय मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
एच डी एफ सी बँकेचे खूप खूप आभार मानण्यात आले सूत्रसंचालनाचे काम आपटी आय सी आर पी कविता धुर्वे यांनी पार पाडले आभार प्रदर्शन दिनेश कोवे यांनी केले अशा पद्धतीने सत्कार पुरस्कार सोहळा पार पडला .
उपस्थित एम एस आर एल एम ऑफिस स्टॉप मिलिंद चोपडे,धन्वंत शेंडे,राजेंद्र खुरपुडे,दिनेश कोवे,अविनाश तरडे,ज्ञानेश्वर जावळे,कवीश्वर लडी,कार्तिकी चांदोरे, प्रफुल पटेलपैक वैशाली पटेलपैक,वर्षा वाघळे,एच डी एफ सी कर्मचारी वर्ग आशिष शहारे,अमोल वैद्य,संदीप इंगोले,सचिन घाटे,लुकेश वैद्य,भारत पवार,अनिल खडसे,सागर झाडे,सचिन काकडे राळेगाव,वरध व वडकी क्लस्टर सर्व, आय सी आर पी उपस्थित होते.

