कंधार – ज्ञानेश्वर कागणे.
कंधार तालुक्यातील एकूण ११६ग्रामपंचायत च्या सरपंचपदाचे आरक्षण उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांचे मार्गदर्शना खाली पार पडले असून यात महिलांसाठी ५९ तर सर्वसाधारण साठी ५७ पदे आरक्षित झाली आहेत.
सुमारे दोन महिन्यापूर्वी आरक्षण सोडत काढण्यात आली होती परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेले २२ टक्के वाढवून २७ टक्के केल्यामुळे परत आरक्षण सोडत घेण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यामुळे आज आरक्षण सोडत काढण्यात आली.
त्यानुसार अनुसुचित जातीसाठी एकूण २४ ग्रा.पं. सरपंच पद आरक्षित असून पैकी महिलांना १२ पदे आरक्षित आहेत. अनु.जमातीसाठी एकूण ३ पदे आरसिन असून पैकी महिलांसाठी २ पदे आरक्षित करण्यांत आली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी एकूण ३१ पदे आरक्षित केली असून पैकी महिलांसाठी १६ पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
सर्वसाधारण साठी एकूण ५८ पदे आरक्षित ठे वली असून पैकी महिलांसाठी २९ पदे आरक्षित ठेवली आहेत. या आरक्षणा मुळे तालुक्यातील ५९ ग्रा. पंचायतवर महिला राज असणार आहे. पुर्वी काढलेल्या आरक्षण सोडतीत फारसा फरक पडला नसून यापुढे इच्छूक उमेदवार झपाटून कामाला लागणार आहेत.ग्रा. पं च्या निवडणूका साधारणपणे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता असून इच्छूकांकडून आतापासूनच मतदारांची मनधरणी करण्यांचे काम चालू होणार आहे. सोबतच यांच्या खिशाला कात्रीही लागणार आहे.


