सिद्धार्थ कदम
पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद: ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव, केंद्र सरकार द्वारे ओबीसीची जाती आधारित जनगणना न करण्याचे विरोधात, बोधगयाचे महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी,वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात व बहुजन महापुरुषांची सतत बदनामी करत असल्याचे विरोधात. भारतभर भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पीछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, तसेच बहुजन समाजातील अनेक संघटनांच्या समर्थनाने भारत बंद आंदोलन यशस्वीरित्या संपन्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून उमरखेड -पुसद मार्गावरील हर्षी व वाशिम- पुसद मार्गावर खंडाळा या दोन ठिकाणी रास्ता रोको करून भारत बंद करण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणपत गव्हाळे, अॅडव्होकेट भारत बरडे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ गंगावणे, भारत मुक्ती मोर्चाचे पश्चिम विदर्भ प्रभारी दीपक कांबळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे तालुका अध्यक्ष शरद कांबळे, जिवक पंडित, भीमराव पडघने, हरिभाऊ कांबळे, गौतम कांबळे यांनी केले. भर पावसाच्या वातावरणात सुद्धा ग्रामीण भागातील असंख्य बहुजन बांधव उपस्थित होते.
यामध्ये गजानन टारपे सरपंच हर्षी, विजय खंदारे पोलीस पाटील, विलास कांबळे, समाधान जोगदंडे, सिद्धार्थ जोगदंडे, दत्ता पाईकराव, विश्वास खंदारे, बेबीताई कांबळे, ढाकरे ताई, सीमाताई जोगदंडे, निर्मला जोगदंडे, रेणुका खंदारे, अर्चना जोगदंडे, रमा जोगदंडे अशा पाईकराव, शकुंतला जोगदंडे, सुनिता जोगदंडे, सखुबाई काळे, राजाबाई खोकले, शांताबाई मुखाडे, किसनाबाई मुकाडे, शांताबाई बुरकुले, बेबीबाई भुरके, दिपाली भाग्यवंत व ग्रामीण भागातील असंख्य बहुजन बंधू आणि भगिनी या आंदोलनात सहभागी होऊन यशस्वी केले त्याबद्दल भारत मुक्ती मोर्चा ने सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले.

