राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
राळेगाव येथे दिनांक १ जुलै २५ रोजी दुपारी १ वाजता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी बबन लोनीकर यांनी शेतकरी, शेतमजुर , लाडक्या बहिणींना अपमानास्पद , बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध करण्यात आला.भारतीय जनता पार्टीच्या नेते मंत्री, पदाधिकारी यांना सत्तेची गरमी आली असल्यामुळे ते जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी, शेतमजुर, लाडक्या बहिणींना अपमानास्पद व बेताल वक्तव्य करीत असल्याचे दिसुन येत आहे.अशातच पुन्हा ऐका भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकारी बबन लोनीकर यांनी शेतकरी, महिला,व लाडक्या बहिणींना अपमानास्पद, बेताल वक्तव्य केल्याने त्यांच्या या अपमानास्पद बेताल वक्तव्याचा राळेगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करुन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रा.वसंत पुरके, माजी शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य, अरविंद वाढोणकर जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, राजेंद्र तेलंगे अध्यक्ष राळेगाव तालुका काँग्रेस कमिटी, प्रदीप ढुने राळेगाव शहर अध्यक्ष, मिलिंद इंगोले सभापती राळेगाव तालुका ख.वि.स.राळेगाव,अंकुश मुनेश्वर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, प्रकाश पोपट, जितेंद्र कहुरके, मधुकर राजुरकर, सचिन टोंग,अशोक काचोळे वनिष घोसले,,सुधिर जवादे, राजेंद्र महाजन, शंकर दातारकर,वर्षाताई तेलंगे, चंदाताई पिपरे,अल्काताई कुडमेते,वेणु मेश्राम, पुष्पा किन्हाके,यामिनी चाफले,ज्योती डंभारे, मालाताई खसाळे माजी नगराध्यक्षा,अश्विनी नागोसे,वैकुंठ मांडेकर,अंकित कटारिया, अंकुश रोहणकर, श्रीधर थुथुरकार, महादेव मेश्राम,वसु, अशोक भागवत , रंजित कोरडे, शुभम चिडाम, राहुल होले,बाळु दरणे, मनोज पेंदोर,दिलीप दुधगिरकर, निलेश हिवरकर चांदेकर,श्रावणसिंग वडते, आशिष कोल्हे,अफसर अली सय्यद,सर, ववडु रायगडे विजय शेंडे,,व इतर काँग्रेस कमिटी नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

