अकोला विभाग प्रतिनिधी: – गणेश वाडेकर
बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. रामप्रकाश मिश्रा रा. गोरक्षण रोड अकोला यांच्यावर ३० ऑगस्ट रोजी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला होता. या घटनेत मीश्रा गंभीर जखमी झाले होते. पोलीस आरोपीचा शोध घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे शंकर शेळके यांनी आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना केले होते. पोलिसांनी मंगेश उर्फ दादा तोताराव सावरकर रा. मिर्ची याला अटक केली. यापुर्वी पवन विठ्ठल कुंभलकर, याला अटक करण्यात आली होती.


