प्रतिनिधी सगीर शेख खर्डी
मुंबई :शहापूर, खर्डी येथील ग्रामपंचायत मध्ये असलेले पूर्वीचे ग्रामसेवक श्री परमार साहेब यांच्याकडे अजूनच ग्रामपंचायतीचा सुद्धा कारभार होता त्यामुळे ते पूर्ण वेळ खर्डी ग्रामपंचायत साठी देत नव्हते यामुळे खर्डी ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या रहिवाशांना रहिवासी दाखले इतर सर्व कामांसाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रोज दिवसेंदिवस हेलपाटे घालावयास लागत होते. सदर विषयाची तक्रार ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सागीर शेख यांच्याकडे केली होती

या अनुषंगाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत शहापूर गटविकास अधिकारी नम्रता जगताप मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे दिनांक 30 मे 2025 रोजी केली होती या मागणीची गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेत खर्डी ग्रामपंचायत येथे तातडीने नवीन ग्रामसेवकाची नेमणूक केली ग्रामस्थांची होणारी गैरसोय तात्काळ दूर करण्यात आली म्हणून मनसेच्या वतीने गटविकास अधिकारी यांचे आभार मानण्यात आले तसेच नवीन आलेले या ग्रामसेवकाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस श्री संजय जी वाढविंदे साहेब उपस्थित होते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खर्डी शहराध्यक्ष सागीर शेख उपविभाग अध्यक्ष प्रकाश जी धाबे, खर्डी महिला विभाग अध्यक्ष सौ. रुक्मिणीबाई वाडेकर आणि मनसे पदाधिकारीउपस्थित होते.

