लातूर जिल्हा प्रतिनिधी: -मोहसीन खान
लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा स्थापन झालेल्या जवळपास 19 बँका असून या बँकांच्या प्रगती समन्वय, नवीन धोरणांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात नागरी बँकांचे फेडरेशन स्थापन करण्यात आलेले आहे. त्याच धर्तीवर लातूर जिल्हा नागरी सहकारी बैंक असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून यामध्ये लातूर जिल्हा नागरी सहकारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची तर असोसिएशनच्या व्हा. चेअरमनपदी सुहास पाचपुते यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या कार्पोरेट कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत जिल्हा निबंधक कार्यालयाचे सोमनाथ पाटील व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. करण्यात आली. यावेळी या बैठकीला अॅड. बादाडे, शिवकुमार पाटील, बाबूराव पाटील, जब्बार सगरे, अशोक अग्रवाल, जगदीश कुलकर्णी, अब्दुल समद शेख, व्यंकटराव पाटील, एमएनएस बँकेचे संचालक सूर्यकांतराव शेळके, रविंद्र कांबळे, सौ. अरुणा कांदे, अॅड. पाटील, एमएनएस बँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक नितीन सराफ यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. नागरी बँकांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी
प्रयत्नशील राहू -माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर महाराष्ट्रातील 19 बैंकासह इतर नागरी बँकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लातूर जिल्हा नागरी
सहकारी बैंक असोसिएशनची स्थापना एकमताने करण्यात आली. या असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सर्वानुमते माझ्यावर सोपविण्यात आली असून या माध्यमातून आपण लातूर जिल्ह्यातील सर्व नागरी बँकांच्या समन्वयातून बँकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे नुतन अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली.
नागरी बँकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करू सुहास पाचपूते लातूर जिल्ह्यातील नागरी बँकांचे प्रश्न बैंक फेडरेशन अभावी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत आहेत. त्यामुळे लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन स्थापन करण्याचा निर्णय माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून लातूर जिल्हा नागरी सहकारी बैंक असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्यामुळे असोसिएशचे अध्यक्ष माजी आ. कव्हेकर साहेब व मी आपल्या समन्वयातून नागरी बँकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन नागरी बँकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करू अशी प्रतिक्रिया लातूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे नुतन उपाध्यक्ष सुहास पाचपुते यांनी केले.

