राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांना जाहीर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना या विषयावर रविवार दि. 29 जून, 2025 रोजी दुपारी 12:30 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, मिनी सभागृह, कोल्हापूर या ठिकाणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत रसाळे यांचे जाहीर व्याख्यान संपन्न झाले, यावेळी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडीचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रकाशक व दिग्दर्शक अनिल म्हमाने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रा. किसनराव कुराडे, डॉ. सोमनाथ कदम, भरत लाटकर, डॉ. श्रीपाद देसाई, डॉ. शोभा चाळके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आदर्श मानून विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध मान्यवरांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान 2025 या पुरस्काराने सन्मानित केले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बार्शी तालुक्यातील पांगरी गावच्या सुकन्या, सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रीय सरपंच संसदेच्या तालुका महिला संघटक कु. रजनी जयसिंह पाटील, यांना आजवर त्यांनी केलेल्या सामजिक कार्याबद्दल राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान 2025 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रमुख अंतिमा कोल्हापूरकर, दिक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वासराव तरटे, निवेदक अर्हंत मिणचेकर, किशोर पोवार, गंगाधर म्हमाने, संग्राम पोवार, अमिरत्न मिणचेकर उपस्थित होते.


