सातारा जिल्हा प्रतिनिधी;:- निलेश कोकणे
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर या महामार्गावर बाह्यवळणाला जोडणारे 20 मार्ग हे अरुंद आहेत त्यामुळे पालखी सोहळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या बाह्यवळनाला जोडणारे वीस अरुंद रस्ते चौपदरी करणार व महिलांसाठी 2000 शौचालये निर्माण करणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
तरडगाव मुक्कामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली व माऊलींचे दर्शन घेऊन प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी मंत्री गोरे यांच्याकडे आळंदी ते पंढरपूर या पालखी सोहळ्यातील अडचणी विश्वस्तांनी मांडल्या.
यावेळी सोहळा प्रमुख डॉक्टर भावार्थ देखणे ,विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम पाटील ,व्यवस्थापक माऊली वीर आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री गोरे म्हणाले बाह्यवळणाला जोडणारे जे 20 रुंद रस्ते आहेत ते चारपदरी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण केली जातील पुढील वर्षी आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर वाहतुकीची कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.
यंदा पालखी सोहळा 1800 मोबाईल टॉयलेट उभारण्यात आली आहेत. त्यासाठी शासनाने 15 कोटी रुपये खर्च केले आहेत हा खर्च दरवर्षी न परवडणार आहे त्यासाठी पालखी तळावर कायमस्वरूपी शौचालय बांधली जातील तसेच महिलांसाठी नवीन 2000 शौचालय बांधली जातील असे ते म्हणाले. यंदा शासनातर्फे वारकऱ्यांना आरोग्य पाणीपुरवठा निवारा रेनकोट आधी सुविधा देण्यात आले आहेत पुढील वर्षी पालखी सोहळ्यात अडचणी येऊ नयेत यासाठी पालखी सोहळे परत गेल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली जाईल म्हणजे पुढील वर्षीचे नियोजन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल असे ते म्हणाले.

