राळेगाव तालुका प्रतिनिधी:- कविता धुर्वे
वडकी: जिल्ह्यात गुरांचे अवैद्य वाहतूक रोखण्याच्या प्रयत्नात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत २७ जून च्या रात्री १५गुरांना जीवनदान दिले आहे या कारवाईत गोवंश वाहतूक करिता वापरण्यात आलेला ट्रक किंमत २० लाख रुपये व गोवंश जातीचे बैल एकूण १५ नग किंमत ३ लाख रुपये असा एकूण २३लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलिसांनी रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर कडून गोपनीय माहिती मिळाली यावरून सापळा रचून
ग्राम कारेगाव फाट्याजवळ एक ट्रक क्रमांक क्र. एम .एच.४०. सी.टी.२१९७ मध्ये अवैद्यरित्या बैलांना (गौवंश जातीचे जनावरे) वाहनात कोंबुन कत्तली करीता वाहतुक करून घेवुन जात असताना पोलिसांनी ट्रक थांबविला असता तिथून वाहन चालक पसारा झाला मात्र ट्रकमध्ये पाहणी केली असता
ट्रक मध्ये १५ बैलांना निर्दयपणे वाहनात कोंबून त्याचे तोंडाला व पायाला आखूड दोरीने बांधून त्यात कोणत्याही प्रकारची चाऱ्या पाण्याची व्यवस्था न करता अवैधरित्या कोंबून कत्तलिकरिता करिता घेऊन जात असल्याचे दिसून आले घटनास्थळ पोलिसांनी जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त केला. यातील फरार वाहन चालकाचे ताब्यातील ट्रक क्रमांक एम.एच.४०.सी.टी.२१९७ मध्ये एकुन १५ नग बैलांना (गोवंश जातीचे जनावरे) निर्दयीपणे वाहनात कोंबुन त्यांचे तोंडाला व पायाला आखुड दोरीने बांधुन त्यांचे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अवैद्यरित्या कोंबुन कत्तल करण्या करीता वाहतुक करून घेवुन जात असतांना मिळुन आल्याने सदरच्या गुन्हा नोंद जबानी रिपोर्ट व मा. ठाणेदार सा. यांचे आदेशावरून कलम ५.५(ब)महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदासह कलम ११(१)(घ)(च)(ज) प्रेरणा प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम सह कलम १८४/१७७ मो.वा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

