जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका मिळवण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्न करू सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
प्रतिनिधी: नागनाथ लांजे
अहमदपूर शहरात नुकताच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दि 28 जुन रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे कार्यालयाचे उद्घाटन केले यावेळी ते बोलत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू असे बोलत होते,पण हे निवडणूक येताच हे पक्ष कार्यालय उघडली जातात हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहत आहे
शहरातील अनेक प्रश्न गेली दहा वर्षात सुटली नाहीत त्यामुळे जनता नाराज आहे अहमदपूर शहरांमध्ये एक ही सार्वजनिक स्वच्छताग्रह नाही मार्केटमध्ये आलेल्या महिलांना लघुशंका करण्यासाठी उघड्यावर जावे लागते शहरातील लोकांना आणखी सुद्धा वापरासाठी पाणी विकत घ्यावे लागते भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा नाही नगरीपरिषद कर्मचारी पोलीस प्रशासनातील अधिकारी यांच्याकडून रोज त्रास होत असतो तर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी भाजीविक्रेते हे हप्तेदार ठरले आहेत.
शहरांमध्ये रस्ते विकासाच्या नावाखाली सिमेंट रस्ते एक महिन्यात तयार केली पहिल्याच पावसामध्ये सर्व पावसाचे पाणी रस्त्यावर एकही रस्त्याला नाली उपलब्ध नाही हे सर्व देखाव्यासाठीच आहे का हा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहे.
सहकार मंत्री पाटील बोलत असताना अविनाश भैया यांनी एशियन पेंट कंपनीमध्ये तालुक्यातील 30 मुले लावळे असे बोलत होते पण तालुक्यात उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या जास्त असून मॅनेजर सुपरवायझर उच्च पदावरच्या नोकऱ्या परराज्यातील लोकांना व आपल्या तालुक्यातील लोकांना फक्त साफसफाई साठी मुले भरती केली आपल्या मुलाने किती दिवस हात काळे करायची हा प्रश्न उभा आहे.
शेतकऱ्यांची कोणतेही प्रश्न सुटत नसल्यामुळे शेतकरी नाराज आहे एक रुपया पिक विमा योजना बंद केली, सोयाबीन हमी भाव,नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीच्या फरकाची रक्कम दिली नाही, सातबारा कोरा केला नाही, विहीर गाय गोठे अनुदान थकित आहेत अनेक प्रश्न शेतकऱ्याचे सोडवण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे हे सरकार फक्त भांडवलदाराचे काम करण्यासाठी आहे अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे.
कष्टाने पिकवलेला भाजीपाला फवारणी खत याचा खर्च पाहता पुन्हा एकदा मार्केटमध्ये बागवान व आडतदारान कडून दहा टक्के दराने पुन्हा शेतकऱ्याकडून वसूल केले जातात, सर्रास कॅरेट मागे शेकडा दहा रुपये वसूल करण्याचे काम गेले अनेक दिवसा पासुन सहकारमंत्र्याच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे.



