राळेगाव तालुका प्रतिनिधी :- कविता धुर्वे
राळेगाव येथील शुक्रवार ला भरणाऱ्या आठवडी बाजारात तसेच बसस्थानक परिसरात संशयास्पदरित्या वावरत असलेल्या तीन इसमास दिं.२७ जून २०२५ रोजी राळेगाव पोलिसांनी पथकाने पकडले आहे.
राळेगाव शहरात दर शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईलचे तसेच पैसे चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असताना आज बाजाराच्या दिवशी
आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या पैसे चोरीच्या घटनांतील दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राळेगाव च्या नवनियुक्त ठाणेदार शितल मालटे मार्गदर्शनात ए एस आय गोपाल वास्टर एन पि सी विशाल कोवे,पि सी सूरज गावंडे (दि.२७) आठवडी बाजारात बंदोबस्त ड्यूटी लावली होती
त्यांना संशयास्पद रित्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान आठवडी बाजार बस स्थानक परिसरात सदर इसम (१) समीर शब्बीर पठाण वय २० वर्ष रंगनाथ नगर वणी (२) अर्जुन गोपाल आडे वय २० वर्ष खरवडा मोहल्ला वणी (३)रोहित गोपाल आडे वय १९ वर्ष खरवडा मोहल्ला हे आढळून आले असून हे तीनही इसम चोरीसारखे हस्तक्षेपनीय गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या फिरत असताना मिळून आले असून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कलम १२८ बी एन एस एस अन्वये कारवाई करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात गोपाल वास्टर विशाल कोवे सुरज गावंडे यांनी केली आहे.


