विदर्भ विभाग प्रमुख:- युसूफ पठाण
आज दि.२७/६/०२५ शुक्रवार रोजी विश्राम गृह वर्धा येधे खासदार मा.अमरभाऊ काळे यांच्या अध्यक्षतेखाली व रेल्वे विभागाचे श्री. अभय पुणवटकर ,श्री.शाहुसर , श्रीकांत पोलंडवार तसेच अन्य अधिकारी सोबत *मी पुलगांवकर जनता* जूना पुलगांव रेल्वे फाटक लवकरात लवकर उघड़ण्यात यावे.
तसेच तेथील राहनाऱ्या नागरिकांना काय त्रास सहन करावा लागत आहे. त्या बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली मा.खासदार साहेबांनी त्यांना सुचित केले कि आपले काम निधी अभावी तसेच तांत्रिकदृष्ट्या बंद पड़ले आहे. ते शुरु होण्याची अवस्था दिसत नाही.
आपण जूना पुलगांव रेल्वे फाटक सुरु करावे. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव रेल्वे रोको आंदोलन करावे लागेल. असे कळविण्यात आले .त्या नंतर रेल्वे विभागाचे अधिकार्यांनी आपल्या कडून सकारात्मक उत्तर दिले. आपण जे पहिले पत्र पाठविले होते.
आम्हाला मिळाले आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागा सोबत चर्चा करुन जूना पुलगांव LC-80 रेल्वे फाटक लवकरच शुरु करण्याचे प्रयत्न करीत आहो. व आपले वरीष्ठ अधिकारी श्री.सुसांतसिंग सोबत फोनवर मा.खासदार साहेबाचे बोलने करुन दिले असे अनेक विषय जूना पुलगांव रेल्वे फाटक उघडण्या संबंधित सांगण्यात आल्या.
बैठकीत माजी नगराध्यक्ष मनिषकुमार साहु ,रमेशभाऊ सावरकर, गजुभाऊ पचारे, निरज ढगे,सुनील ब्राह्मणकर, इरफान बेग सर,पवनकुमार साहु, अमरभाऊ तिनघसे,मुन्नाभैय्या शुक्ला,अनिल मगर,श्यामभाऊ देशमुख, अवधूत दुपारे,प्रमोदभाऊ ठाकरे,संतोषभाऊ देशमुख उपस्थित होते.


